मोठी बातमी : LPG ला पर्याय सापडला! पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा – 20 वर्षांच्या संशोधनाला यश DME Gas Update

DME Gas Update: जगभरात सुरू असलेल्या तणावपूर्ण परिस्थितीमुळे इंधनाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः अमेरिका-इस्रायल-इराण या देशांमधील तणावामुळे जागतिक बाजारात इंधनटंचाईची भीती निर्माण झाली आहे. याच पार्श्वभूमीवर भारतातही एलपीजी गॅसच्या उपलब्धतेवर परिणाम होत असल्याचे चित्र दिसत आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील शास्त्रज्ञांनी एलपीजीला पर्याय ठरू शकणाऱ्या नवीन गॅसची निर्मिती केल्याचा दावा केला आहे.

पुण्यातील शास्त्रज्ञांचे मोठे संशोधन

पुण्यातील National Chemical Laboratory (NCL) मधील संशोधकांनी डायमिथाईल इथर (DME) नावाचा गॅस विकसित करण्यात यश मिळवल्याची माहिती दिली आहे. या संशोधनाचे नेतृत्व शास्त्रज्ञ Dr. Thirumalaiwami Raja आणि त्यांच्या टीमने केले. तब्बल 20 वर्षांच्या सातत्यपूर्ण संशोधनानंतर हा गॅस तयार करण्यासाठी आवश्यक असलेले विशेष उत्प्रेरक (Catalyst) प्रयोगशाळेत विकसित करण्यात आले आहेत.

Also Read:

संशोधकांच्या मते, या उत्प्रेरकांच्या मदतीने तयार होणाऱ्या DME गॅसचे उत्पादन प्रयोगशाळेत यशस्वी झाले असून सध्या पायलट प्रोजेक्टअंतर्गत दररोज सुमारे 250 किलो गॅस तयार केला जात आहे.

LPG मध्ये 8 टक्क्यांपर्यंत मिसळता येणार

संशोधकांनी सांगितले की, हा DME गॅस एलपीजीमध्ये सुमारे 8 टक्के प्रमाणात मिसळून वापरता येतो. औद्योगिक कंपन्यांसोबत करार करून मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाल्यास हा गॅस इंधन क्षेत्रात महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. त्यामुळे भारताचे परदेशी इंधनावर असलेले अवलंबित्व काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे.

Also Read:

पर्यावरणपूरक आणि स्वच्छ इंधन

DME गॅसचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे तो तुलनेने अधिक स्वच्छ इंधन मानला जातो. एलपीजीच्या तुलनेत त्याची ज्वाळा (फ्लेम) अधिक पारदर्शक असते, त्यामुळे धूर आणि प्रदूषण कमी होते. त्यामुळे भविष्यात हा गॅस पर्यावरणपूरक पर्याय म्हणूनही महत्त्वाचा ठरू शकतो. विशेष म्हणजे हा गॅस स्वतंत्रपणेही वापरता येतो, तसेच एलपीजीसोबत मिश्रण करूनही वापरता येतो.

LPG पेक्षा स्वस्त होण्याची शक्यता

शास्त्रज्ञांच्या मते, जर DME गॅसचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन सुरू झाले तर त्याची किंमत एलपीजीपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उद्योग, हॉटेल्स तसेच इतर क्षेत्रांमध्येही याचा वापर वाढू शकतो.

भारतात LPG ची प्रचंड मागणी

अहवालानुसार भारतात दरवर्षी सुमारे 31.3 दशलक्ष टन एलपीजीचा वापर केला जातो. यापैकी जवळपास 87 टक्के एलपीजी घरगुती स्वयंपाकासाठी वापरला जातो. परंतु भारताच्या एकूण एलपीजी गरजांपैकी सुमारे 62 टक्के गॅस आयात केला जातो.

यातील मोठा हिस्सा होर्मुझ सामुद्रधुनी (Strait of Hormuz) या मार्गाने भारतात येतो. मध्यपूर्वेत वाढलेल्या तणावामुळे या मार्गावर अडथळे निर्माण झाल्यास भारतासह अनेक देशांच्या इंधनपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.

भविष्यात मोठा बदल शक्य

तज्ञांच्या मते, जर DME गॅसचे औद्योगिक पातळीवर उत्पादन सुरू झाले तर भारताला एलपीजीवरील आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास मोठी मदत होऊ शकते. यामुळे ऊर्जा सुरक्षेसोबतच इंधनाच्या किमतींवरही सकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे.

Leave a Comment